भुसावळ - तालुक्यातील मिरगव्हाण शिवारातील गट नं. 96/1, 96/2, 96/3 हे रहिवास प्रयोजनार्थ असतांना बियाणी पब्लिक स्कुलचे संचालक मंडळ कांताबाई बन्सीलाल बियाणी, मनोज बन्सीलाल बियाणी, विनोद बन्सीलाल बियाणी, ममता श्रीकांत कलंत्री यांच्याकडून वाणिज्य वापर होत असल्याची तक्रार सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.
या प्रकरणी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी 1 लाख 39 हजार 13 रूपये दंडाचे आदेश 20 ऑक्टोबर 23 रोजी दिले होते. त्या आदेशाविरूध्द माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी अप्पर जिल्हाधिकारी जळगाव यांच्या न्यायालयात आरटीएस/अपिल क्र.182/2023 दाखल केले होते. त्या अपिलाचा निकाल अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी 13 सप्टेंबर 2024 रोजी देण्यात आला.
त्या आदेशामध्ये अपिलार्थी यांचे अपिल मंजुर करण्यात येत आहे व उपविभागीय अधिकारी भुसावळ भाग भुसावळ यांच्याकडील क्र./जमीन/एसआर/206/2023 मधील दि. 20-10-2023 रोजीच्या आदेशात अंशताः सुधारणा करण्यात येवून निकर्षात नमुद केल्याप्रकरणी शास्तीची रक्कम 3 लाख 14 हजार 213 मात्र करण्यात येते,असे आदेश देण्यात आलेले आहे. बियाणी परिवारातर्फे अॅड.कल्याण पाटील व अॅड.संदीप ठाकरे यांनी तर सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी स्वतः आपली बाजू मांडली.
Social Plugin