नाशिक - येथील जीआरपी व रेल्वे सुरक्षा बल तसेच नाशिकरोड विभागाचे अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली की,एक इसम हावडा मेल वरून सोने चोरून पळून गेला असून वरिष्ठांच्या आदेशान्वये तात्काळ पथकास पाचारण करण्यात आले पथकाने रेल्वे स्थानकावरून एक संशयितास ताब्यात घेऊन 3200000 लाख रुपये किंमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक 21.09.2024 रोजी नाशिक जीआरपी आणि आरपीएफ आणि शहर पोलिस नाशिकरोड यांना एक व्यक्ती सोने चोरून पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर, हावडा मेल क्रमांक 12109 वरून गाडी आली. नाशिक रेल्वे स्थानकात झडती घेतल्यानंतर एच 1/जी कोच मध्ये अमित पाल नावाचा आरोपी सापडला, त्याला आरपीएफ, जीआरपी आणि नाशिकरोड यांनी पकडले आणि त्याला नाशिक जीआरपी पोलिस ठाण्यात आणले 3200000/- लाख रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे.
Social Plugin