गावठी पिस्टल मॅगझीनसह व दोन जिवंत काडतुस व एक गावठी कट्टा मॅगझीन


वरणगांव - येथील पोलीस स्टेशनचे सपोनि भरत चौधरी यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दोन इसम ऑर्डनस फॅक्टरी कडे जाणा-या रोडवरील फाट्यावर गावठी पिस्टल घेऊन दशहत माजविज आहे.तात्काळ पथकास रवाना करून मिळालेल्या माहिती खात्री करून दोन संशयितांना सापळा रचून ताब्यात घेतले दोघांची अंगझडती घेतली असता एक गावठी पिस्टल मॅगझीनसह व दोन जिवंत काडतुस व एक गावठी कट्ट्याचे मॅगझीन असे जप्त करण्यात असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

माहिती अशी की,मुक्ताईनगर येथील रहिवासी सिध्दार्थ भालेराव व अनिरूध्द ठाकुर हे गावठी पिस्टल घेवुन वरणगांव कडुन मुक्ताईनगर कडे जाणा-या रोडवर हॉटेल वर चहा पिऊन पुढे ऑर्डनस फॅक्टरी कडे जाणा-या रोडवरील फाट्यावर दशहत माजविज आहे. अशी खात्रीशीर बातमी पोलीस स्टेशनचे सपोनि भरत चौधरी यांना मिळाली होती त्यावरून पोउनि रामदास गांगुर्डे,पोहेकाँ यासिन पिंजारी,प्रेमचंद सपकाळे,मनोज म्हस्के, ईश्वर तायडे अशांनी सदर ठिकाणी जावुन बातमी प्रमाणे दोन इसम हे संशयीतरित्या सदर ठिकाणी दिसुन आल्याने सदर इसमावर अचानक ५ :०० वाजेला छापा टाकून जागीच पकडले असता त्यांचे नावे सिध्दार्थ संतोष भालेराव वय २३ वर्ष,अनिरूध्द कैलास ठाकुर वय २० वर्ष दोन्ही राहणार मुक्ताईनगर असे असुन त्यांचे अंग झडतीत २५००० रूपये किंमतीचा एक.सिल्वर रंगाचा अवैध गावठी कटटा मॅगझीनसह तसेच ४००० रूपये किमतीचे दोन जिवंत काडतुस,५००० रूपये किंमतीचे गावठी कटयाचे एक मॅगझीन असे मिळून आले.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक,महेश्वर रेडडी,अपर पोलीस अधिक्षक,अशोक नखाते,  उपविभागीय पोलीस अधिकारी, राजकुमार शिंदे, यांचे मार्गदर्शनाखाली वरणगांव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि भरत चौधरी पोउनि रामदास गांगुर्डे, पोहेकॉ यासिन पिंजारी, प्रेमचंद सपकाळे, पोकाँ गनोज म्हस्के, इश्तर तायडे,भुषण माळी.गोपिचंद सोनवणे, सायबराव कोळी अशांनी मिळून सदरची कारवाई केली आहे.