वानखेड :- (मध्य प्रदेश ब्युरो शालिनी शर्मा)
साधारणपणे सत्तेत असलेल्या पक्षात युवक प्रवेश करतात. वानखेड गाव मध्ये काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. विशेषता हे चित्र आहे.
डाँक्टर सौ.स्वातीताई वाकेकर यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून वानखेड येथील युवकांनी युवक काँग्रेस मद्ये प्रवेश केला.काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, पक्षसंघटन मजबूत करण्याचे आश्वासन या युवकांनी दिले. पक्षात प्रवेश करणाऱ्या या युवकांचा समाजसेवीका आणी डाँक्टर सौ. स्वातीताई वाकेकर यांनी काँग्रेसचा दुप्पटा देऊन स्वागत केले. समाजसेवीका डॉक्टर सौ.स्वातीताई वाकेकर गावागावात जाऊन तेथील गावकऱ्यांच्या अडीअडचणी जाऊन घेत आहे.तातडीने समस्यांचा निपटारा करीत आहे. त्यांच्या या कार्याने प्रभावीत होऊन वानखेड येथील युवकांनी युवक काँग्रेस मध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.
नुकताच पार पडलेल्या एका छोट्याखानी कार्यक्रमात गणेश खंडेतोड, सचिन शिरस्कार, दीपक इंगळे,अमित शिरस्कार, तसेच मोरया ग्रुपच्या सदस्यांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी संतोष येनकर, मनोज पालीवाल , निलेश भाऊ आंबुस्कार,अक्षय बंड(येनकर) सह असंख्य वानखेड येथील काँग्रेस प्रेमी कार्यक्रमाला उपस्थित होते.या युवकांनी काँग्रेसचे पक्षसंघटन वाढविण्याचे आश्वासन दिले.
एकेकाळी जानराव बापु देशमुख यांच्या नेतृत्वाखाली वानखेड येथील असंख्य युवक भारतीय जनता पक्षाचे काम करत होते. जानराव बापु यांच्या निधनानंतर आम्हाला वाऱ्यावर सोडल्याची खदखद या युवकांनी बोलवुन दाखवली.
Social Plugin