भुसावळात एका गावठी पिस्तूलासह दोन काडतूस जप्त



भुसावळ -  शहरातील वरणगांव रोडवरील एम.आय.डि.सी. परिसरातील सदगुरु इंजिस्टीट जवळील बांधकाम चालु असलेल्या शापींग काम्पलेक्स जवळ रेकॉड वरील गुन्हेगार हरीष उजलेकर हा येणार असल्याची खात्रीशीर बातमी पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाली.तात्काळ पथकास दालनात बोलावून 

माहितीची खात्री करून कारवाईचे आदेश दिले.

सदरील पथकाने घटनास्थळी पोहचून संशयिता कडून एक गावठी पिस्टल सह दोन जिवंत काडतुसे जप्त केले 

दरम्यान शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना (ता.१४) रोजी साडे पाच वाजेला गोपनीय माहिती मिळाली की,रेकॉड वरील गुन्हेगार राहुल उजलेकर राहणार वरणगांव ता. भुसावळ हा अग्नीशत्र घेवुन कोणतातरी गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशाने  वरणगांव रोडवरील एम.आय.डि.सी. परिसरातील सदगुरु इंजिस्टीट जवळील बांधकाम चालु असलेल्या शापींग काम्पलेक्स जवळ येणार आहे.


त्यावरुन पोलिस उपनिरी.मंगेश जाधव, विजय  नेरकर,निलेश चौधरी,महेश चौधरी,राहुल वानखेडे,भुषण चोधरी,प्रशांत परदेशी,जावेद शहा अंशानी सदर ठिकाणी जावुन सापळा रचून इसमावर अचानक सहा वाजेच्या सुमारास वाजता छापा टाकुन त्यास जागीच पकडले असता त्याच्या अंगझतीत एक लोखंडी गावठी पिस्टल दोन जिवंत राऊंड (काडतुस) असे एकूण 17,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे.


सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,अप्पर पोलीस अधिक्षक अशोख नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांचे मार्गदर्ना खाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन पो. उपनिरी. मंगेश जाधव,विजय नेरकर,निलेश चौधरी,महेश चौधरी, राहुल वानखेडे,भूषण चौधरी,प्रशांत परदेशी ,जावेद शहा अशांनी केली आहे.