जामनेर रोडचे पंधरा वर्षानंतर भाग्य उजळले


भुसावळच्या रखडलेल्या रस्त्याचे पंधरा वर्षानंतर भाग्य उजळले 

भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरून प्रवास करणारे नागरीक गेले पंधरा वर्षांपासून यमयातना भोगत आहे.अखेर शेवटी काही दिवसांवर आचार संहिता येऊन ठेपली असून माजी नगरसेवक तसेच नागरीकांच्या पुढाकाराने आमदार संजय सावकारे यांच्या निधीतून विकास कामांचे एक कोटी रुपयांचे नारळ फोडण्यात आल्याने रखडलेल्या रस्त्याचे कामांचे तब्बल पंधरा वर्षानंतर भाग्य उजळले आहे.

भुसावळ नगर पालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक २१ मधील पराग भोळे यांच्या घरापासून यशवंत फालक यांच्या घरापर्यंत रस्ते काँक्रिटकरण तसेच पेव्हर ब्लॉक बसवण्याचा ५० लक्षचे तसेच भुसावळ नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक २१ मधील योगेश पाटील यांच्या घरापासून मोहन भारंबे यांच्या घरापर्यंत रस्ते काँक्रिटकरण व पेव्हर ब्लॉक बसवण्याचे ५० लक्ष रुपयांचे असे एकूण एक कोटी रुपयांची विकास कामे आमदार संजय सावकारे यांच्या निधीतून मंजूर करण्यात आली असून गेले पंधरा वर्षांपासून नागरीक यमयातना भोगत असून वाहन चालकांना अनेक मणक्यांच्या आजारांशी झुंज दयावी लागत आहे.आगामी निवडणुका तोंडाशी आलेल्या असून विकास कामांच्या अनुषंगाने आमदार संजय सावकारे यांनी एक कोटी रुपयांचा आमदार निधी मंजूर करून आणल्याले गेले पंधरा वर्षांपासून रखडलेले कामाला एकप्रकारे गती मिळाल्याने नागरीकांमध्ये आनंद दिसत असून दिलासा दिल्याचे चित्र दिसत आहे.