भुसावळ - शहरातील वांजोळा रोडवरील प्रेरणा नगर फाट्या जवळ दोन इसम त्यांच्या कब्जात गावठी पिस्टल बाळगून फिरत असल्याची गोपनीय बातमी पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाल्याच्या आधारे पोलीस पथकास मोटरसायकलने घटनास्थळी रवाना करून सापळा रचून मिळालेल्या माहितीची खात्री करण्यास सांगितले असता पोलिसांनी दोन संशयित इसमांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून दोन गावठी पिस्टल सह दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.
माहिती अशी की,बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल वाघ यांना गोपनीय माहिती मिळाली की,शहरातील वांजोळा रोडवरील प्रेरणा नगर फाट्या जवळ दोन इसम त्यांच्या कब्जात गावठी बाळगून फिरत आहेत.निरीक्षकांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील पोउपनिरी मंगेश जाधव,पोलीस हवलदार विजय नेरकर,निलेश चौधरी,महेश चौधरी,प्रशांत सोनार, अमर अढाळे, जावेद शहा,भूषण चौधरी, राहुल वानखेडे अशांनी सदर इसमाचा शोध घेतला असता संशयित आरोपी मुकेश मोहन अटवाल ( वय.२०) यश किरण बोयत (वय.२२) दोघा राहणार भुसावळ असे त्यांच्या कब्जातुन गावठी पिस्टल सह दोन जिवंत काडतुस एकूण ५१ हजार रुपयांचे किंमतीचे (ता.५) ऑक्टोबर रोजी चार वाजून वीस मिनिटांनी पोलिसांनी हस्तगत केले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीसअधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे भुसावळ भाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव,विजय नेरकर,निलेश चौधरी, महेश चौधरी,प्रशांत सोनार, अमर अढाळे, जावेद शहा,भूषण चौधरी,राहुल वानखेडे अशांनी मिळून केली.
Social Plugin